येवला नगरपरिषद तर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापनेचे आवाहन
येवला – येवला नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी नागरिकांना यंदाच्या गणेशोत्सवात शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे नदी, तलाव व विहिरींचे प्रदूषण वाढते तसेच जलीय जीवसृष्टीवर परिणाम होतो. त्यामुळे सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक सण साजरा करून स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सव घडवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वडगाव येथे कापसे फाउंडेशन तर्फे गाईच्या शेणापासून गणेश मूर्ती बनवण्यात आले असून तरी जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरण पूरक बनवलेली गणेश मूर्तीची स्थापना करावी
मुख्याधिकारी यांनी सांगितले की शाडू मातीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात व पर्यावरणास हानी पोहोचवत नाहीत. विसर्जनासाठी नगरपरिषदेकडून कृत्रिम तलावांची सोय करण्यात येणार आहे. मूर्ती व सजावटीसाठी पर्यावरणास हितकारक साहित्याचा वापर करावा. नागरिकांनी स्वच्छता व शिस्त पाळून गणेशोत्सवात सहकार्य करावे.
नगरपरिषदेकडून स्वच्छता मोहीम, जनजागृती कार्यक्रम व विसर्जन व्यवस्थापनाची योग्य नियोजन करण्यात आली असून सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी केले आहे.
यावेळी वडगाव येथील कापसे फाउंडेशन येथे गणेश मूर्तीची पाहणी करताना उपमुख्य अधिकारी चंद्रकांत भोई स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे, प्रकल्प अधिकारी संदीप बोढरे शहर समन्वयक गौरव चुंबळे आदी उपस्थित होते